Post office schemes in Marathi

गुंतवणुक करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या सुरक्षित व जबरदस्त उत्पन्न देणाऱ्या योजना

Post office schemes in Marathi | गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजना खुपच लोकप्रिय आहे. कारण यामध्ये रिस्क राहत नाही. आणि तुमचे पैसे सुरक्षीत राहतात.

या लेखात आपन पोस्ट ऑफिसच्या सर्व महत्वाच्या योजनांबद्दल साध्या आणि सोप्या भाषेत माहिती बघणार आहोत.

बऱ्याच लोकांना पोस्ट ऑफिस मधील या योजनांची माहिती नसते. तर मग जाणून घ्या पोस्ट ऑफिस योजना.

आपल्याला पोस्ट ऑफिस 9 वेगवेगळ्या बचत योजना देत असते. त्यामधील 5 योजनांना सेक्शन 80 सी अंतर्गत करातून सूट दिलेली आहे. या योजना खुपच सुरक्षीत असतात. त्यामूळे एकदा तरी या योजनांबद्दल माहिती घ्यायलाच हवी.

पोस्ट ऑफिस बचत खाते | Post office schemes in Marathi

Post office schemes in Marathi

पोस्ट ऑफिस मध्ये प्रतेक व्यक्तीला आपले बचत खाते (Saving account) उघडता येते. आज जरी बचत खात्याची ही सुविधा बँकेत मिळत असली तरी पोस्ट ऑफिसचे बचत खात्याची गोष्ट काही वेगळीच आहे.

हे बचत खाते अनेकांसाठी आजही खुप महत्वाचे आणि लोकप्रिय आहे. आज पण खुप सारे लोक पोस्ट ऑफिस मध्ये आपलं बचत खातं उघडतात.

पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते चालू करण्यासाठी जवळपास 500 रुपये खर्च येत असतो. बचत खात्यामधील पैशांवर 4 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.(Post office saving account in Marathi)

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी | PPF scheme in Marathi | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड

Post office PPF scheme in Marathi

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये केली जाणारी गुंतवणूक खुप सुरक्षीत आणि कर पासून सुटका असणारी ओळखली जाते.

या योजनेचा फायदा सर्व भारतीय नागरिकांना घेता येतो. वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती PPF अकाउंट उघडू शकते. खाते उघडण्यासाठी 100 रुपये खर्च येतो.

राष्ट्रीयकृत बँका किंवा पोस्ट ऑफिसमध्ये PPF खाते उघडल्या जाते. एका व्यक्तीला एक खाते मिळते. या खात्या मध्ये कमीत कमी 500 तर जास्तीत जास्त 1,50,000 रुपये चालू आर्थिक वर्षात भरता येतात.

जर दीड लाख रुपये रकमेच्या वरील रक्कम या खात्यात ठेवली तर त्याला व्याज मिळत नाही. या योजनेद्वारे मिळणारे व्याज सरकार दरवर्षी ठरवत असते. आता सद्या वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते. ही योजना अधिक सुरक्षीत असल्यामूळे लोकांमध्ये खुप लोकप्रिय आहे.

हे पण वाचा

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना | Post office monthly income scheme in Marathi

Post office MIS scheme in Marathi

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post office MIS scheme in Marathi) ही योजना सरकारच्या लोकप्रिय सेविंग योजनेमधील एक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती भारतीय नागरीक असावा लागतो.

नियमित महिन्याला उत्पन्न देणारी योजना म्हणून ही योजना लोकप्रिय आहे. या योजनेमध्ये व्यक्तीला एक वैयक्तिक खाते आणि एक जॉइंट खाते उघडता येते. तीन व्यक्ती एक जॉइंट खाते उघडू शकतात.

वैयक्तिक खात्यामध्ये 4.5 लाखांपर्यंत रक्कम ठेवता येते तर जॉइंट खात्यामध्ये याची मर्यादा 9 लाख रुपये आहे. 4.5 लाख रुपये गुंतवणुकीवर दर महा 2475 रुपये मिळतात.

पाच वर्षाच्या कालावधी नंतर संपुर्ण रक्कम मिळते. या योजनेवर सद्या 6.6 टक्के वार्षिंक व्याज मिळत आहे. नियमित मासिक उत्पन्न आणि सुरक्षीत गुंतवणूक हे या योजनेचे वैशिष्ट्ये आहे.

जेष्ट नागरीक बचत योजना | Post office scheme in Marathi

Post office schemes in Marathi

जेष्ट नागरीक बचत योजना ही वय वर्ष 60 पार केलेल्या जेष्ट नागरिकांसाठी आहे. जेष्ट नागरिक आपल्या जवळ असलेल्या शिल्लकच्या रकमेला या योजनेत गुंतवू शकतात. आणि नियमित व्याज उत्पन्न मिळवून आपला उदारनिर्वाह करू शकतात.

ही योजना जेष्ट नागरिकांसाठी खुपच फायदेशीर आहे. कारण यामध्ये गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षीत राहतात. जेष्ट नागरीक बचत योजनेसाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून अप्लाय करू शकतात.

वयाचे 60 वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय जेष्ट नागरिकांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेमध्ये कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपये एवढी रक्कम गुंतवणूक करता येते.

या योजने अंतर्गत सरकार 7.4 टक्के व्याज देत आहे. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असतो. ठरावीक वेळेच्या अगोदर तुम्हाला रक्कम काढायची असेल तर मुळ रकमेच्या 1 ते 2 टक्के दंड आकारला जातो.

किसान विकास पत्र | Kisan Vikas Patra Scheme in Marathi

Kisan Vikas Patra Scheme in Marathi

KVP in Marathi ही योजना पैसे दुप्पट करून देणारी योजना म्हणून प्रसिद्ध आहे. पोस्ट ऑफिसची ही योजना खुप लोकप्रिय आहे. या योजनेत देखील वैयक्तिक आणि जॉइंट खाते उघडता येतात. कोणीही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

एका व्यक्तीला एक वैयक्तिक खाते आणि जास्तीत जास्त 3 व्यक्ती मिळून एक जॉइंट खाते उघडता येते.

पैसे गुंतवणूकीचा विचार जर केला तर, कमीत कमी 1,000 आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम तुम्ही गुंतवू शकतात. 10 वर्ष आणि 4 महिने पुर्ण झाल्या नंतर तुम्हाला पैसे दुप्पट मिळतात.

सध्या यो योजने अंतर्गत मिळणारे व्याजदर 6.9 इतके आहे. किसान विकास पत्र( KVP in Marathi) या योजनेच्या अगेंस्ट तुम्हाला कर्ज देखील मिळण्याची सुविधा आहे.

पोस्ट ऑफिस आरडी योजना | Post office RD scheme in Marathi

Post office RD scheme in Marathi

मित्रांनो, या योजनेमध्ये तुम्ही आपल्या सेविंग नुसार नियमित रक्कम भरू शकता. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपोझिट योजना असे आहे.

RD Scheme चा मॅच्युअर कालावधी 5 वर्षांचा आहे. दर महिन्याला कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम तुम्हाला जमा करता येते. यावर मिळणारे व्याज 5.8 इतके आहे.

जर तुम्ही 12 महिने नियमित हफ्ते भरले तर तुम्हाला जमा झालेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते.

सुकन्या समृध्दी योजना | Sukanya Samriddhi Yojana in Marathi

Sukanya Samriddhi Yojana in Marathi

‘बेटी बचाव बेटी पढाव’ या योजने अंतर्गत सरकारने ही योजना चालू केलेली आहे. सुकन्या समृध्दी योजना लहान मुलींसाठी खुप चांगली योजना आहे.

आपल्या मुलीच्या नावाने पालक हे खातं उघडू शकतात. त्यासाठी मुलीचं वय 0 ते 10 वर्ष वय असणं गरजेचं आहे. पालक आपल्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पोस्ट ऑफिस किंवा बँक यापैकी कोणत्याही एक ठिकाणी हे खाते उघडता येते. या खात्यात कमीत कमी 250 रुपये व जास्तीत जास्त एक वर्षात 1.5 लाख जमा करता येतात.

या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड 21 वर्षांचा आहे. जर मुलीचे लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केले गेले तर पालक मॅच्युरिटी पिरेड अगोदर काढू शकतात. या योजने अंतर्गत मिळणारे व्याज कर मुक्त असते. 7.6 टक्के व्याजदर या योजनेतून मिळते.

पोस्ट ऑफिस टाईम डिपोजिट | Post office schemes in Marathi

Post office schemes in Marathi

बँक एफडी सारखी सुविधा पोस्ट ऑफिस देखील नागरिकांना पुरवत असते. वरील योजनांप्रमाणे नागरिक या योजनेसाठी खातं उघडू शकतात.

नागरिक कमीत कमी 200 रुपये तर जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकतात. यावर मिळणारे व्याज कालावधी नुसार वेगवेगळे आहे.

1 ते 3 वर्षांसाठी व्याज 5.5 टक्के मिळते तर 5 वर्षांसाठी ठेवल्यावर 6.7 टक्के व्याज मिळते. पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेसाठी मिळणारे व्याज भारतीय स्टेट बँक पेक्षा अधिक असते.

राष्ट्रीय बचत प्रामाणपत्र | National saving certificate in Marathi

National saving certificate in Marathi

राष्ट्रीय बचत प्रामाणपत्र ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते. कोणताही भारतीय नागरिक एक वैयक्तिक आणि जॉइंट खातं उघडू शकतो. जॉइंट खाते जास्तीत जास्त 3 नागरिक मिळून उघडू शकतात.

या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड 5 वर्षांचा असतो. या मध्ये कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवता येते. सध्या या योजनेसाठी 6.8 टक्के व्याजदर मिळत आहे.

देशाचे अर्थमंत्री प्रतेक क्वार्टर (Quarter) मध्ये व्याजदर निश्चित करत असतात. या योजनेचं खातं उघडण्यासाठी तुम्हाला योजनेचा एक फॉर्म, फोटो, ओळख पत्र इत्यादीची गरज पडते. National saving certificate in Marathi

पोस्ट ऑफिसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज (Apply post office schemes in Marathi)

(1) सर्वप्रथम ज्या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे त्या योजनेबद्दल संपुर्ण माहिती मिळवा.

(2) तुमच्या गावतील किंवा जवळील पोस्ट ऑफिसला भेट द्या.

(3) ज्या योजनेसाठी अप्लाय करायचा असेल त्या योजनेचा फॉर्म घ्या.

(4) फॉर्म वरील माहिती भरल्यानंतर अवश्यक असलेली डॉक्यूमेंट जोडा.

गुंतवणुक करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या सुरक्षित व जास्त उत्पन्न देणाऱ्या योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *